Thum Creative Paryavaran Dakshata Kruti Manch

ई-वेस्ट संकलन

प्रकल्पाची यशस्विता एका दृष्टिक्षेपात

  • पुणे शहरात XXX ई-वेस्ट संकलन केंद्रांची स्थापना 
  • XXX इतक्या गृहनिर्माण संस्थांमध्ये जनजागृती आणि संकलन कार्यक्रम.
  • आजवर XXX किलो ई-वेस्ट संकलन 

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर अपरिहार्य झाला आहे. यामध्ये कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स, मोबाईल फोन्स, टेलिव्हिजन सेट्स आणि अशा अनेक उपकरणांचा समावेश आहे. दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या या वस्तू निरुपयोगी झाल्यानंतर त्या सहसा कचऱ्यात टाकल्या जातात किंवा भंगार मध्ये दिल्या जातात. सामान्यपणे याला ‘ई-वेस्ट’ असे म्हणतात. इलेक्ट्रॉनिक उपकरणांतल कंडेन्सर, ट्रान्सफॉर्मर्स, इंटिग्रेटेड सर्किट्स, पी सी बी अशा घटाकांमध्ये अनेक प्रकारच्या रसायनांचा, प्लास्टिकचा, खनिज मूलद्रव्यांचा आणि मौल्यवान धातूंचा वापर केलेला असतो. या वस्तू कचऱ्यात, उघड्यावर टाकून दिल्यास त्यांचा संपर्क जमीन आणि पाण्याशी येतो. बऱ्याच वेळा या वस्तू एकत्र करून जाळून टाकल्या जातात. यामुळे जमीन, पाणी आणि हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. उपकरणांमध्ये वापर केलेल्या खनिज मूलद्रव्यांचा आणि मौल्यवान धातूंचा नाश होतो. नवीन उपकरणे तयार करण्यासाठी खनिज मूलद्रव्यांचा आणि मौल्यवान धातूंचा नव्याने वापर करावा लागतो. म्हणजेच नवीन उत्खनन आणि त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करावी लागते. याचा पर्यावरणावर दुहेरी ताण येतो. जमीन, पाणी आणि हवेचे प्रदूषण, तसेच नवीन उत्खनन आणि प्रकिया या सर्व बाबी सहज टाळता येतात. यासाठी नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे संकलन करून त्यांच्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी पुढे पाठवावे लागते. यासाठीच थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचने ‘ई-वेस्ट’ संकलनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. 

पुणे महानगर पालिका आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्याने पुणे शहरात XXX ठिकाणी ई-वेस्ट संकलन केंद्रे थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच ने स्थापित केले आहेत. यासोबत अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये आमचे कार्यकर्ते जातात आणि नागरिकांकडील ई-वेस्ट संकलित करतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून आजवर XXX किलो इतके ई-वेस्ट थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच ने संकलित केले आहे. संकलित केलेल्या ई-वेस्ट चे वर्गीकरण केले जाते. त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी (रिसायकलिंग) पुढे पाठवले जाते.