थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच

पर्यावरण विषयक जनजागृती अभियान

पुढच्या पिढीला पर्यावरणा बाबत संपूर्ण माहिती प्राप्त व्हावी तसेच जमीन, हवा,पाणी प्रदूषणाचे धोके काय आहेत या बाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणा विषयी काम करणाऱ्या वेगवेगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी शाळा, कॉलेजेस मध्ये उपलब्ध करून देतो.

वेगवेगळ्या प्रसंगी या संदर्भात वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन असे उपक्रम देखील चालवितो. आम्ही ८०० पेक्षा जास्त शाळांबरोबर या संदर्भात काम करतो. या उपक्रमांत हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते.