थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच
environment-web

पर्यावरण, कृषी, ग्रामविकास आणि जनजागृतीसाठी आम्ही राबवत असलेले विविध प्रकल्प

वैज्ञानिक गो आधारित शेती

हानिकारक आणि प्रदूषणकारी रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशके यांच्यावापरा ऐवजी ‘वैज्ञानिक गो आधारित शेती’ विषयक जनजागृती आणि प्रशिक्षण देणारा प्रकल्प.  

शेतकऱ्याचे उत्पन्नाचे स्रोत दृढ करणे

शेतीसोबत जोडधंदा म्हणून फायद्यातील दुग्ध व्यवसाय करण्यासाठी जनावरांचे शास्त्रीय संगोपन कसे करावे याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांच्या गोठयावर जाऊन देणारा प्रकल्प.   

प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान

पंढरपूर वारीमध्ये वारकऱ्यांनी प्लास्टिक, थर्माकोलच्या डिशेस, ग्लास, कप्स ऐवजी नैसर्गिक पानांपासून बनवलेल्या पत्रावळी वापराव्यात या विषयी जनजागृती करणारा प्रकल्प.  

निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मिती प्रकल्प

पुणे शहरातील मंदिरात दररोज तयार होणाऱ्या निर्माल्याचे संकलन करून त्याची भुकटी करून त्यापासून नैसर्गिक, सुगंधी अगरबत्ती तयार करण्याचा प्रकल्प.  

पुणे शहरात प्लास्टिक संकलन

पर्यावरणास हानिकारक असलेले प्लास्टिक नागरिकांनी फेकून देऊ नये तर पुनर्वापर प्रक्रियेस द्यावे या विषयी जनजागृती करणारा आणि प्लास्टिक संकलन करणारा प्रकल्प.  

वारी मार्गावर निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प

पंढरपूर वारीदरम्यान दररोज हजारो टन निर्माल्य तयार होते. ते संकलित करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करून वारीमार्गातील शेतकऱ्यांना मोफत वितरित करणारा प्रकल्प.

वारी मार्गावर ३३ गावांमध्ये ग्रामसुधारणा अभियान

वारीमार्गातील लहान गावांवर वारीदरम्यान मोठा ताण येतो. हा ताण सुसह्य करण्यासाठी प्रथम टप्प्यात ३३ गावांमध्ये विविध ग्रामसुधार उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.  

आळंदी येथे निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प

श्रीक्षेत्र आळंदी मध्ये दररोज मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होते. ते संकलित करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना मोफत वितरित करणारा प्रकल्प.

शाळा आणि गावांमध्ये प्लास्टिक संकलन

प्लास्टिक प्रदूषणाबाबत शालेय विद्यार्थ्यांना जागृत करणे आणि त्यांच्या घरातील प्लास्टिक संकलित करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

पर्यावरणपुरक गणेशोत्सव

गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जावा यासाठी पुणे शहरात अनेक उपक्रम गणेशोत्सवादरम्यान राबवले जातात. 

स्वयंजागृती प्रकल्प

ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना “गो आधारित वैज्ञानिक शेती” कशी केली जाते याचे प्रात्यक्षिकासहित प्रशिक्षण देणारा हा पथदर्शी प्रकल्प आहे. 

गोशाळा प्रकल्प

भारतीय गो वंशाचे संवर्धन आणि जतन करणे, गो आधारित उत्पादनांची निर्मिती करून महिलांची रोजगार निर्मिती करणे यासाठी ‘गोशाळा’ हा प्रकल्प राबवला जात आहे.  

महापूर आणि कोरोना साथीमध्ये साहाय्य

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराच्या वेळी आणि कोरोना साथी मध्ये रुग्णालये आणि संस्थांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी विशेष मोहीम राबवली गेली. 

पर्यावरणपूरक पत्रावळ, द्रोण वापरण्यास प्रोत्साहन

पाण्याची बचत करण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहांमध्ये स्टील प्लेट्स ऐवजी नैसर्गिक पानांपासून तयार केलेल्या प्लेट्स वापरल्या जाव्यात यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

पर्यावरण विषयक जनजागृती अभियान

सर्वसामान्य नागरिक तसेच शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी व्याख्याने, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे वर्षभर आयोजन केले जाते. 

राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जनजागृती

तरुणांना राष्ट्रभक्तीची आणि सामाजिक कर्तव्यांची प्रेरणा देण्यासाठी व्याख्यानमाला आणि विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.