थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच
about-us

परिवर्तनाची त्रिसूत्री... प्रबोधन, प्रकल्प आणि जनसहभाग

आम्ही समाजातील सर्व जीवमात्रांसाठी काम करतो

आमच्या विषयी

थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच ही अशासकीय संस्था (NGO) आहे. संस्थेची स्थापना २०१६ साली झाली असून मा. धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्याकडे संस्था नोंदणीकृत आहे. (संस्था नोंदणी अधिनियम १८६० – महा १७४४/२०१५ पुणे दिनांक २२-१२-२०१५ आणि मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० – एफ-४७७९४/पुणे दिनांक १५-१०-२०१६)

मानवी वर्तनामुळे पर्यावरणाची जी हानी होते, त्यामुळे मानव स्वतःच वारंवार संकटात सापडत आहे. मानवाची या संकटातून सोडवणूक करायची असेल तर पर्यावरणाची हानी भरून काढायला हवी सोबत पर्यावरणाचे संरक्षण, जतन आणि संवर्धन करायला हवे या प्रेरणेतून थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच ची स्थापना करण्यात आली आहे. आपण निसर्गाला वाचवले तरच निसर्ग आपल्याला वाचवेल हा संदेश जनसामान्यांपर्यंत नेणे आणि त्यादृष्टीने लोकसहभागातून विविध उपक्रम हाती घेणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. आपल्या उद्देश्यपूर्तीसाठी स्थापनेपासूनच संस्थेने पर्यावरण विषयक अनेक सामाजिक उपक्रम आणि प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. आजवरच्या वाटचालीमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि अनेक मान्यवर संस्थांचे पाठबळ संस्थेला लाभत आले आहे.  पुढेही संस्था आपल्या उद्दिष्टपूर्तीसह अधिक जोमाने कार्यरत राहील आणि पर्यावरण संरक्षण, संवर्धनाच्या दृष्टीने उपयुक्त असलेले उपक्रम यशस्वीपणे राबवेल.    

संस्थात्मक संरचना

prashant-avachat

श्री. प्रशांत अवचट, अध्यक्ष

M.Com, विविध सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय. व्यवसाय: शेती  

vaishali-lahade

सौ. वैशाली लहाडे, उपाध्यक्षा

श्री. श्रीधर देशमुख, सचिव

श्री. प्रवीण धारणे, कोषाध्यक्ष

सल्लागार समिती

डॉ. संतोष गटणे

BAMS. वैद्यकीय सेवेचा १२ वर्षांचा अनुभव. निरामय मानवी आरोग्य आणि पशु आयुर्वेद या विषयांतील तज्ज्ञ 

prashant-yogi

डॉ. प्रशांत योगी

MVSc DBM PGT (Israel) पशु वैद्यक तज्ज्ञ म्हणून ३० वर्षांचा अनुभव. पशूंची उत्पादकता या विषयातील तज्ज्ञ 

rajendra-sambre

श्री. राजेंद्र सांबरे

BSc. Agri.
सेंद्रिय शेती या क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून २५ वर्षांचा अनुभव

sadanand-kulkarni

श्री. सदानंद कुलकर्णी

Dip in Mass Comm, Google Certification in Digital Marketing   
माध्यम व्यवसायातील २० वर्षांचा अनुभव 

कार्यालयीन कर्मचारी

vijay-sohoni

श्री. विजय सोहोनी

अकाउंट्स & ऍडमिन

sunita-avhad

श्रीमती सुनीता आव्हाड

घनकचरा प्रकल्प व्यवस्थापक 

श्री. भाई ताम्हाणे

जनसंपर्क अधिकारी

श्री. सुभाष जाधव

कार्यालय व्यवस्थापक

siddhesh-sawant

श्री. सिद्धेश सावंत

कार्यालय व्यवस्थापक

atharv-chimte

श्री. अथर्व चिमटे

विक्री आणि विपणन

श्री. राजेंद्र अनारसे

ग्रामविकास प्रकल्प व्यवस्थापक 

सहभागी व्हा, आपलेही योगदान द्या

पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जनजागृती हे एक व्यापक कार्य आहे. समाजातील सर्व घटकांचा यात सहभाग असेल तरच हे कार्य प्रभावीपणे पुढे नेता येईल. यासाठी आपण आपले योगदान द्यावे ही विनंती. आपल्याला शक्य असेल त्या मार्गाने या कार्यात आपण सहभागी होऊ शकता.