थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच

पर्यावरणपूरक गणेशोत्सव

गणेशोत्सव म्हणजे आनंदाची, उत्साहाची आणि मांगल्याची पर्वणी. पुणे आणि परिसरातील गणेशोत्सवाला एक आगळे महत्व आहे. दरवर्षी साजरा केला जाणारा गणेशोत्सव नागरिकांनी अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा यासाठी कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच विविध उपक्रम राबवित आहे. यामध्ये माती, नैसर्गिक रंग वापर यांचा करून गणेशमूर्ती तयार करण्यासाठी जनजागृती मोहिमा, कार्यशाळा, स्पर्धा यांचे आयोजन करणे, नैसर्गिक पाने-फुले पर्यावरणपुरक साहित्याचा वापर करून आरास करण्यास प्रोत्साहन देणे, विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलित करून त्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करणे असे विविध उपक्रम राबवले जातात. याच बरोबर गणेशोत्सवापूर्वी शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सवाविषयी जागरूकता निर्माण करणे, यासाठी चित्रकला, निबंध स्पर्धांचे आयोजन करणे इत्यादी उपक्रम राबवले जातात. 

२०२१ च्या गणेशोत्सवात जवळपास ३.५ लाख नागरिकांशी विविध मार्गानी संपर्क साधून त्यांच्यामध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सवाविषयी जागरूकता निर्माण केली आहे. यासाठी १५ हजार रंगीत पोस्टर्स, २ लाख छापील पत्रके आणि सोशल मीडिया पोस्ट्स यांचा वापर केला गेला आहे. गणेशोत्सवापूर्वी ४० गृहनिर्माण संस्थांमध्ये स्टॉल्स उभे केले होते. त्यातून मातीचा, पर्यावरण पुरक साहित्याचा आणि नैसर्गिक रंगाचा वापर केलेल्या गणेशमूर्तींची विक्री केली गेली आहे. याचबरोबर निर्माल्यापासून आम्हीच तयार केलेल्या अगरबत्तीच्या ९५० बॉक्सेसची विक्री केली आहे. 

गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची स्थापना करण्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात विरघळत नाहीत, तसेच त्यावरील रासायनिक रंगांमुळे पाण्याचे प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी नागरिकांनी मातीच्या गणपतीची स्थापना करावी, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची स्थापना केली असेलच तर त्यांचे दान करावे यासाठी विसर्जनाच्या दिवशी जनजागृती करण्यात आली. यासाठी विसर्जन घाटांवर स्टॉल्स उभे करण्यात आले होते. यावर्षीच्या गणेशोत्सवात ३०,००० प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे संकलन दानाच्या माध्यमातून केले गेले आहे. पूजेसाठी वापरलेल्या निर्माल्याचेही विसर्जन नदीत करू नये यासाठी विसर्जन घाटांवर निर्माल्य संकलन करण्यात आले. यासाठी ‘स्वच’ या संस्थेच्या ३,५०० कचरावेचकाना थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचच्या वतीने १३,००० मोठी पोती पुरवण्यात आली. त्यातून विसर्जनाच्या तीन दिवसांमध्ये २५० टन निर्माल्य संकलित करण्यात आले. पुणे महानगर पालिकेच्या सहकार्याने त्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्यात आले.   

गृहनिर्माण संस्थांमध्ये जनजागृती 

पर्यावरणपुरक गणेशमूर्ती निर्मिती संचाची विक्री 

पर्यावरणपुरक गणेशमूर्तीची विक्री 

पर्यावरणपुरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा 

पर्यावरणपुरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा 

पर्यावरणपुरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा 

विसर्जनानंतर निर्माल्य संकलन 

विसर्जनानंतर निर्माल्य संकलन 

संकलित निर्माल्यातून खतनिर्मिती