थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच

निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मिती प्रकल्प

प्रकल्पाची यशस्विता एका दृष्टीक्षेपात

  • पुणे शहरातील नद्यांचे निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यास हातभार.
  • चार महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. 
  • ०१ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या दरम्यान १८,००० अबरबत्ती बॉक्सेसची विक्री केली गेली आहे.
  • टाकाऊ निर्माल्याच्या व्यवस्थापनाचा पथदर्शी प्रकल्प म्हणून अनेक संस्थांनी नावाजलेला प्रकल्प 

पुणे महानगर पालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये अनेक मंदिरे असून तेथे रोज मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. ते नदीत विसर्जित करता येत नाही तसेच प्रत्येक ठिकाणी त्याचे वेगळे व्यवस्थापन करणे देखील शक्य नाही म्हणून ते ओल्या कचऱ्याबरोबर जात होते. या निर्माल्याचा पुनर्वापर करून त्याच्यापासून संपूर्ण नैसर्गिक साहित्यापासून प्रिमिअम दर्जाची सुगंधी अगरबत्ती तयार करण्याचा अभिनव प्रकल्प थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच राबवत आहे. पुणे महानगर पालिका आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पुणे शहरात वडगाव बु. सिंहगड रोड येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. 

ही अगरबत्ती श्रीकृष्ण, पंचयाग, सप्त चिरंजीव अशा ३ सिरीज आणि २० सुगंधात तयार केली जाते. पुणे महानगर पालिकेच्या साहाय्याने मंदिरांतील निर्माल्याचे संकलन आणि वर्गीकरण करून त्याला वाळवले जाते आणि त्याची भुकटी केली जाते. या भुकटी सोबत पंचगव्य, निरनिराळ्या आयुर्वेदिक वनस्पती आणि नैसर्गिक सुगंधी अर्कांचा आणि वस्तूंचा वापर करून प्रिमिअम दर्जाची नैसर्गिक मसाला अगरबत्ती येथे तयार केली जाते. या प्रकल्पामुळे सध्या ४ महिलांना रोजगार प्राप्ती झाली आहे. भविष्यात कमीत कमी २० महिलांना रोजगार उत्पन्न होणार असून जशी-जशी विक्रीमध्ये वाढ होईल तशा इतरही रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.

तयार झालेल्या अगरबत्तीची विक्री हौसिंग सोसायटीज, थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता मंचचे इतर प्रकल्प तसेच कांही कंपन्यांच्या सहकार्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना केली जात आहे. १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान १८,००० अगरबत्ती बॉक्सेसची विक्री करण्यात आली आहे. ई-कॉमर्स वेबसाईट्स आणि ऑनलाईन मार्केटप्लेसेसवरही या अगरबत्तीची विक्री करण्याचे नियोजन आहे. 

या अगरबत्तीची विक्री, विपणन करण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी कृपया श्री विजय सोहोनी यांच्याशी 9225500975 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. 

या अगरबत्तीची विशेषता

  • निर्माल्याचा उपयोग तसेच भारतीय गोवंशाच्या शेणाचा वापर करून केलेली अगरबत्ती
  • निरनिराळ्या नैसर्गिक, आयुर्वेदिक वनस्पती आणि वस्तूंचा वापर करून केलेली अगरबत्ती
  • विविध मंदिरातील प्रासादिक निर्माल्याचा वापर केल्याने पवित्र वातावरणाचा अनुभव देणारी अगरबत्ती
  • पंचगव्याचा वापर केला असल्यामुळे यज्ञ, याग, हवन करण्याचा अनुभव देणारी अगरबत्ती

या प्रकल्पातून होणारे सामाजिक फायदे :

  • सामाजिक भावनांचा आदर – निर्माल्याचे नदीमध्ये विसर्जन केले जाऊ नये तसेच ते कचऱ्यातही जाऊ नये या दोन्ही बाबीवर त्याचा पुनर्वापर हाच सुयोग्य पर्याय आहे.
  • निर्माल्याचे योग्य नियोजन – निर्माल्यातील पाकळ्यांचे वर्गीकरण करून त्याची भुकटी बनवली जाते. निर्माल्याचा उर्वरित भागाचा वापर सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापरला जातो. हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना दिले जाते.
  • रोजगार निर्मिती आणि महिला सबलीकरण- या प्रकल्पामुळे सध्या ४ महिलांना रोजगार प्राप्ती झाली आहे. भविष्यात कमीत कमी २० महिलांना रोजगार उत्पन्न होणार असून जशी जशी विक्रीमध्ये वाढ होईल तशा इतरही रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.
  • टाकाऊ पासून उपयोगी उत्पादन निर्मिती करण्याचा पथदर्शी प्रकल्प.
  • पुणे शहरातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यास हातभार.

अगरबत्ती मसाला मिश्रण 

अगरबत्ती हाताने वळताना 

अगरबत्ती हाताने वळताना 

अगरबत्ती पॅकेजिंग

अगरबत्ती विक्री स्टॉल 

अगरबत्ती विक्री स्टॉल 

गृहनिर्माण संस्थांमध्ये विक्री