ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन कृतकृत्य होण्यासाठी संपूर्ण देशभरातून हजारो भाविक श्रीक्षेत्र आळंदी येथे दररोज भेट देत असतात. येणारे भक्त समाधीस्थळी हार व फुले अर्पण करतात. या निर्माल्याची यांची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा विकसित नसल्याने पर्यावरणाची हानी होणे या सोबत भाविक भक्तांची श्रद्धा पायदळी तुडवली जाणे अशी दुहेरी समस्या इथे होती. याचबरोबर भोजनप्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या ताट व वाटी धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जायचे. या ऐवजी आता देवस्थान संस्थानने नैसर्गिक पानांपासून बनवलेल्या पत्रावळी आणि द्रोण वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांची योग्य विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न होता. या समस्येवर मात करण्यासाठी थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच, कमिन्स इंडिया फाउंडेशन व श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांचे संयुक्त विद्यमाने एप्रिल २०१९ पासून निर्माल्य तसेच द्रोण आणि पत्रावळींपासून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याची सुरुवात एप्रिल २०१९ मध्ये करण्यात आली आहे.
सन २०१९ च्या अतिवृष्टी मध्ये इंद्रायणी नदीचे पाणी प्रकल्पस्थळी भरल्याने पहिल्या बॅचचे खत पुरामध्ये वाहून गेले. त्यानंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी १६,८७० किलो निर्माल्यापासून ३,३०० किलो खत तयार केले गेले. हे खत आळंदी परिसरातील शेतकरी बांधवांना समारंभ पूर्वक वितरण करण्यात आले आहे. ऊरलेले खत संस्थानने केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात वापरण्यात आले आहे.
मधल्या काळात कोरोना साथीमुळे मंदिर बंद होते त्यामुळे या प्रकल्पाचे कामही थांबले होते. आता परिस्थिती पूर्वपदावर येताच हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित झाला आहे.
प्रकल्पाचा शुभारंभ
आळंदी येथील प्रकल्प
निर्माल्याचे वर्गीकरण
निर्माल्य क्रश करणारे यंत्र
क्रश केलेल्या निर्माल्याचे वाफे
सेंद्रिय खत निर्मिती साठी वाफे झाकून ठेवले जातात
तयार झालेल्या खताचे देवस्थान समिती मार्फत वाटप
तयार झालेल्या खताचे देवस्थान समिती मार्फत वाटप
तयार झालेल्या खताचे देवस्थान समिती मार्फत वाटप
Copyright 2022 | Thum Creative Paryavaran Dakshata Kruti Manch | Website designed by Digital Canvas