प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणाबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. संस्कारक्षम वयातील विद्यार्थ्यांना या वयातच पर्यावरण विषयक सजगता आली तर उद्याचे पर्यावरणस्नेही नागरिक आजच घडतील या प्रेरणेतून हा उपक्रम राबवला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक समस्या, त्यातून येणारी संकटे आणि या विषयी माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील प्लास्टिकच्या निरुपयोगी वस्तू शाळेत आणण्यास सांगितले जाते. यामुळे विद्यार्थी घरातील इतर सदस्यांसोबत या विषयी चर्चा करतात. यामुळे साहजिकच घरातील इतर सदस्यांनासुद्धा प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणाची माहिती मिळते. विद्यार्थ्यांनी आणलेल्या प्लास्टिकचे संकलन थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृतीमंच चे कार्यकर्ते करतात. संकलित प्लास्टिक पुनर्निर्माणासाठी पुढे पाठवले जाते.
कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम पुणे शहर आणि जवळच्या दहा गावांमध्ये राबवला जात आहे. शाळांचे व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा उत्फुर्त सहभाग या उपक्रमात मिळत आहे.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवाहन आणि मार्गदर्शन
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवाहन आणि मार्गदर्शन
विद्यार्थ्यांच्या घरचे प्लास्टिक संकलन
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवाहन आणि मार्गदर्शन
विद्यार्थ्यांच्या घरचे प्लास्टिक संकलन
विद्यार्थ्यांच्या घरचे प्लास्टिक संकलन
विद्यार्थ्यांनाचा उत्स्फूर्त सहभाग
विद्यार्थ्यांनाचा उत्स्फूर्त सहभाग
विद्यार्थ्यांनाचा उत्स्फूर्त सहभाग
विद्यार्थ्यांच्या घरचे प्लास्टिक संकलन
Copyright 2022 | Thum Creative Paryavaran Dakshata Kruti Manch | Website designed by Digital Canvas