थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच

वारी मार्गावर द्रोण पत्रावळी आणि निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प

पंढरपूर वारीमध्ये वारकऱ्यांनी आणि नागरिकांनी भोजनासाठी पत्रावळी आणि द्रोण यांचा वापर करावा यासाठी थं क्रिएशन पर्यावरण दक्षता कृती मंच तर्फे राबवलेल्या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातून दिंड्या मार्गस्थ झाल्यानंतर पुढे सासवड आणि फलटण ही शहरे वगळता पंढरपूरपर्यंत बहुतेक सर्व ग्रामपंचायती आहेत. वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वापरलेल्या पत्रावळी आणि द्रोण यांची योग्य विल्हेवाट लावण्यास त्या सक्षम नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि वारी मार्गातील पाच ग्रामपंचायती यांच्या सहकार्याने थं क्रिएशन पर्यावरण दक्षता कृती मंच द्वारे हा प्रकल्प राबवला जातो. वारीतील वारकऱ्यांनी, दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी वापरलेल्या पत्रावळी, द्रोण तसेच फुल, तुळशी इत्यादीचे निर्माल्य संकलित केले जाते. यासाठी संस्थेचे ४५ कार्यकर्ते आणि संबंधित ग्रामपंचायतींचे कर्मचारी कार्यरत असतात. यासाठी १० वाहनांची सोय पूर्ण वारी दरम्यान केलेली असते. द्रोण पत्रावळी आणि निर्माल्य वेगवेगळे संकलित करून ते मार्गातील पाच ठिकाणी एकत्र केले जाते. त्यांच्यावर भारतीय गायीचे शेण, गोमूत्र यांची प्रक्रिया करून सकस सेंद्रिय खत तयार केले जाते. सेंद्रिय शेती विषयातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हे खत तयार केले जाते. हे सेंद्रिय खत त्या परिसरातील शेतकऱ्यांना नंतर मोफत वितरित केले जाते.  

वारीतील निर्माल्य 

निर्माल्य संकलन 

निर्माल्य संकलन 

वारीतील वापरलेल्या पत्रावळी

वारीतील वापरलेल्या पत्रावळी

वापरलेल्या पत्रावळींचे संकलन 

वापरलेल्या पत्रावळींचे संकलन 

वापरलेल्या पत्रावळींचे संकलन 

संकलित पत्रावळी खतनिर्मितीसाठी नेताना 

संकलित पत्रावळी खतनिर्मितीसाठी नेताना 

खतनिर्मिती प्रक्रियेतील पहिला टप्पा 

खतनिर्मिती प्रक्रियेतील दुसरा टप्पा 

खतनिर्मिती प्रक्रियेतील तिसरा टप्पा 

तयार झालेले आणि पिशव्यांमध्ये भरलेले खत